बुलढाणा (हॅलो बुलढाणा) कामगारांच्या विविध समस्यांना घेऊन आज काँग्रेसचा मोर्चा जिल्हा कामगार कार्यालयावर धडकला. कामगारांच्या हितासाठी कितीही खटले दाखल झाले तरी मागे हटणार नाही, असा खणखणीत इशारा जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी दिला.
काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी जिल्हा कामगार अधिकारी राठोड यांना धारेवर धरले असता, दोनशे ते तीनशे कामगारांना कीट तीस दिवसात वाटप होणार असल्याचे आश्वासित करण्यात आले. यावेळी राहुल बोंद्रे म्हणाले की, चिखली तालुक्यात सक्रिय एकोणीस हजार कामगारांची नोंदणी झाली आहे. जिल्हाभरात किट वाटप सुरू असताना चिखली तालुक्याला वंचित ठेवण्यात आले. पंधरा हजार किट गोडाऊनला पडून आहेत. साहित्याचे वाटप सत्ताधारी लोकप्रतिनिधींचे कार्यालयातून होत आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधी स्वतःचा फोटो लावून त्यांच्या कार्यालयात साहित्याची वाटप करीत आहेत. यात कमिशनही खाल्ल्या जात आहे. ३० जुलै पर्यंत कामगारांना किट वाटप झाल्या नाही तर गोडाऊनचा ताबा घेऊ असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.
यावेळी मा. आ. हर्षवर्धन सपकाळ, आमदार धिरज लिंगाडे, मा. आ. दिलीपकुमार सांनंदा यांनी जिल्हा कामगार अधिकारी राठोड यांना विविध प्रश्नांसाठी धारेवर धरले.यावेळी हाजी रशीद खान जमादार, डॉ अरविंद कोलते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस च्या सचिव जयश्रीताई शेळके, कुणाल बोन्द्रे, युवक जिल्हाध्यक्ष अनिकेत मापारी, कामगार काँग्रेस जिल्हाध्यक्ष मो. एजाज मो. आदी उपस्थित होते.