बुलडाणा (हॅलो बुलढाणा) विठुरायाच्या चरणी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव सपत्नीक नतमस्तक होऊन सर्वांना चांगल आयुष्य,आरोग्य लाभो आणि बळीराजासाठी चांगला पाऊस पडू दे… असं साकडं विठू चरणी घातलं
आषाढी एकादशी निमित्त श्री पांडुरंगाची शासकीय पूजा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या सहचारिणी सौ.लताताई यांच्या हस्ते संपन्न झाली.यावेळी केंद्रीय आयुष स्वतंत्र प्रभार तथा आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव त्यांच्या सहचरणी सौ.राजश्रीताई जाधव यांनी उपस्थित होत्या. केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी श्री.पांडुरंगाचे मनोभावे दर्शन घेतले.देशातील प्रत्येक नागरिकांना चांगलं निरोगी आयुष्य मिळू दे… अन्नधान्य पुरवणाऱ्या बळीराजासाठी दमदार पाऊस होऊ दे …असे साकडेही केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी विठुराया चरणी घातलं
▪️केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांची 41 वी वारी
देशाचे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव हे विठुरायाचे परमभक्त आहेत. कोरोनाचा दोन वर्षाचा कार्यकाळ सोडला तर गेल्या 41 वर्षापासून ते आषाढी एकादशीला नियमितपणे विठू चरणी नतमस्तक होण्यासाठी जात असतात. ही आषाढीची प्रतापरावाची 41 वी वारी महत्वपूर्ण ठरली कारण शिवसेनेचे नेते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या सोबत शासकीय पूजेला उपस्थित राहण्याचा मान ही केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांना मिळाला.