बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आगामी
बुलडाणा विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हिंदूहृदयसम्राट स्व. बाबसाहेब ठाकरे व पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारांना तळगाळातील घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी बुलडाणा जिल्हा संघटक प्रा. सदानंद माळी यांनी ‘शिव विचार संकल्प संपर्क अभियानाची मुहूर्तमेढ आषाढी एकादशीच्या पर्वावर रोवली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कार्यकर्त्यांची फळी निर्माण करून पक्षाची मोट बांधत आहे. दरम्यान
उबाठा शिवसेनेने देखील कंबर कसली आहे. मुख्यमंत्री असतांना उद्धव ठाकरे यांनी केलेली
शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी योजना, कोरोना काळात केलेली जनहिताची कामे, कुटुंब प्रमुख म्हणून राज्याचे स्विकारलेले पालकत्व व प्रचंड महामारीच्या काळात सुरक्षा, जनतेला दिलेला धीर व वाढवलेला आत्मविश्वास अशा अनेक बाबींची चर्चा या संपर्क अभियानाच्या माध्यमांतून जनतेत जाऊन केली जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या कारभारावर ‘शिंदे फडणवीस व पवार’ यांनी आणलेल्याअविश्वासाबद्दल जनतेत जाऊन सांगितले जात असून,या गद्दारांना धडा शिकविण्याचा संकल्प यावेळी प्रा. सदानंद माळी यांनी केला. शिव संकल्प संपर्क अभियानाची सुरुवात मोताळा तालुक्यातून करण्यात आली.रिधोरा, वाडी, गुगळी व विहा या गावांना भेटी दिल्या. यावेळी प्रामुख्याने प्रा.डॉ. गणेश हुडेकर, रघुनाथ जाधव, रिबोरा सरपंच रविचव्हाण, उपसरपंच मोटे,दिपक कानडजे, स्वप्नील प्रधान, संजय बरटि, रमेश नारखेडे, प्रतापसिंग सोढके रमेश वाघ, संजुभाऊ पाटील शिवाजी खडके, गजानन इंगळे, विजय तायडे, रवि तायडे गजानन सपकाट, शंकर सपकाळ, डि एस सपकाळ, चंदाताई सोनूने, शुभम घोंगडे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.