spot_img
spot_img

भाईजींनी भाविकांसाठी दिली गोड बातमी! -10 दिवसीय दिव्य संकल्प यात्रेत विशेष रेल्वेने तीर्थक्षेत्रांचे होणार दर्शन!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सर्व भाविकांसाठी एक गोड बातमी अशी की,येथील सद्भावना सेवा समितीच्या वतीने भाविकांसाठी दहा दिवसीय दिव्य संकल्प यात्रा आयोजित करण्यात आली.या यात्रेदरम्यान अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या जाणार आहे. यासाठी सद्भावना सेवा समितीच्या वतीने विशेष रेल्वेचेही नियोजन करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी दिली. सदर यात्रा ही 10 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान नियोजित आहे.

या तीर्थयात्रेत सहभागी होण्याकरिता भाविकांनी सेवा सद्भावना समितीचे बुलढाणा येथील चंपालाल शर्मा, नागपूर येथील परमेश्वर लढा,अमरावती येथील सुशील सारडा,अकोला येथील हरीश मानधना, तेल्हारा येथील पवन चांडक,घनश्याम बागडी, संतोष महेंद्र आर्वी येथील संदीप केला, दिग्रस येथील अशोक राठी, शेगाव येथील गोपाल राठी, नांदेड येथील संतोष गुडघेला, परळी येथील अशोक भाला, राजनांदनगाव येथील गणेश डागा, ब्रह्मपुरी येथील अजय भट्टड, बीड येथील केदार मानधना, आर्वी येथील पनपालिया, आदींशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमीच तत्पर असणाऱ्या सद्भावना सेवा समिती बुलढाणा च्या वतीने दरवर्षी बुलढाणा मध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते,असे राधेश्याम चांडक यांनी सांगून ते पुढे म्हणाले की,धर्मप्रचार व प्रसाराची धुरा खांद्यावर घेतलेल्या सद्भावना सेवा समिती कडे होणारी नागरिकांची मागणी पाहता सद्भावना सेवा समितीच्या वतीने दिव्य संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या यात्रेसाठी विशेष रेल्वे सुविधाही उपलब्ध केली जाणार आहे. या यात्रेदरम्यान विदर्भ मीरा म्हणून ओळखले जाणाऱ्या परमपूज्य संत अलका श्री देखील उपस्थित राहणार आहेत. यासंदर्भात नुकतेच अकोला येथील वेलकम सभागृहात बैठक घेण्यात आली असता यावेळी समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी सांगितले.या बैठकीचे सुत्रसंचलन प्रा प्रकाशचंद पाठक यांनी केले.

▪️ या तीर्थक्षेत्राचे होणार दर्शन..

यात्रेदरम्यान जगन्नाथ पुरी,गंगासागर,वाराणसी, काशी, आयोध्या, मथुरा, वृंदावन आदी अनेक तीर्थक्षेत्रांचे भाविक भक्तांना दर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.

▪️अशी राहणार यात्रा….
11 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता सदर यात्रेची सुरुवात अकोला रेल्वे स्थानकावरून केली जाणार आहे यावेळी सकाळी नऊ वाजता सदर रेल्वे जगन्नाथ पुरीसाठी प्रस्थान करेल. त्यानंतर सदर यात्रा ही कोलकत्ता येथे पोहोचणार त्या ठिकाणी मंगळवार 12 नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह एकादशी निमित्त गंगासागर चे दर्शन 13 नोव्हेंबर रोजी वाराणसी कडे प्रवास 14 नोव्हेंबर रोजी वैकुंठ एकादशी निमित्त काशी विश्वनाथ दर्शन गंगा आरती होईल त्यानंतर रात्री सदर यात्रा अयोध्या कडे रवाना होईल शुक्रवारी 15 नंबर रोजी देव दिवाळीनिमित्त सदर यात्रेचे आगमन हे आयोध्यात होणार त्या ठिकाणी शरयू नदीमध्ये स्नान आयोध्या दर्शन आयोध्या भ्रमण होणार. शनिवार 16 नोव्हेंबर रोजी अयोध्येमध्येच संत अलका श्री यांचे सुंदर कांड उत्सव चे आयोजन करण्यात आलेले आहे. रात्री सदर यात्रा मथुरा कडे रवाना होईल.रविवार 17 नोव्हेंबर रोजी सदर यात्रेचे मथुरा मध्ये आगमन त्या ठिकाणी वृंदावन दर्शन व नंतर मंगळवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान सदर यात्रा ही अकोला रेल्वे स्थानकावर पोहोचणार. या ठिकाणी सदर यात्रेचे समापन होईल.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!