spot_img
spot_img

पटवाऱ्यांनी का पुकारला एल्गार?

साखरखेर्डा (हॅलो बुलढाणा)पटवाऱ्यांच्या प्रस्तावित , अन्यायकारक व बेकायदेशीर बदल्यांच्या संदर्भात विदर्भ पटवारी संघटनेने जिल्हा प्रशासनाचे विरोधात एल्गार पुकारला असून आपल्या प्रलंबित विविध मागण्या तातडीने मंजूर करण्याबाबत मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

जिल्हा प्रशासनाने अवैध रेती उत्खनन व अवैध रेती साठा प्रकरणी महसूल, पोलिस व परिवहन या तिन्ही विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची सामुहिक जबाबदारी असतांनाच देखील केवळ तलाठी यांना जबाबदार धरून त्यांच्या गैरसोयीचे ठिकाणी बदल्यांचा तसेच नियतकालिक बदल्यांसाठी पात्र तलाठी यांचे समुपदेशन न घेता अन्यायकारक बदल्यांचा प्रस्ताव मान्यतेसाठी विभागीय आयुक्ता अमरावती कडे पाठविला आहे.या प्रस्तावित अन्यायकारक व बेकायदेशीर बदल्यांच्या विरोधात महसूल विदर्भ पटवारी संघटनेने जिल्हा प्रशासनाचे विरोधात एल्गार पुकारला आहे. बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित मागण्या विषयी जिल्हा प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे तलाठी व मंडळ अधिकारी संवर्गामध्ये असंतोष निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणाविरोधात प्रस्तावित व अन्यायकारक बदल्या रद्द करणे व ईतर प्रलंबित मागण्या संदर्भात विदर्भ पटवारी संघ नागपूर , शाखा बुलढाणा चे जिल्हाध्यक्ष विजय धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली ता. १६ जुलै रोजी जिल्हा प्रशासनाला आंदोलनाची नोटीस दिली आहे . प्रस्तावित अन्यायकारक बदल्या रद्द करणे , विनंतीवरून व आपसी बदल्या करणे , जिल्हा स्तरावरील तलाठी आस्थापना रद्द करणे , जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी , नविन लॅपटॉप व प्रिंटर विना विलंब देण्यात यावेत , कार्यालयाचे प्रलंबित भाडे देण्यात यावे , नायब तहसिलदार पदासाठी तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना खाते अंतर्गत विभागीय परीक्षा लागू करण्यात यावी याशिवाय ईतर प्रलंबित आर्थिक व सेवा विषयक मागण्या पूर्ण न झाल्यास १८ जुलैपासून काळ्या फिती लावून कामकाज करण्यात येईल . तसेच २३ जुलै रोजी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन , २५ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल. २६ जुलै रोजी डी.एस्.सी तहसिल कार्यालयात जमा करणे व २९ जुलै रोजी सामूहिक रजा आंदोलन करणे ,असा इशारा पटवारी संघाने दिला आहे . यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय धोंडगे, सुर्यकांत सातपूते , जिल्हा सचिव अशोक शेळके , जिल्हा उपाध्यक्ष विनोद भिसे , जिल्हा सचिव शिवानंद वाकणकर , जिल्हा सहसचिव संजय डुकरे , कोषाध्यक्ष संतोष राठोड यासह जिल्ह्यातील सर्व पटवारी संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!