बुलढाणा (हॅलो बुलढाणा) दामिनी अर्थात वीज! ती कडाडली की भल्या-भल्यांची भांबेरी उडते. वन्यजीव सोयरे यांची दामिनी देखील शहरी व ग्रामीण भागात कडाडणार आहे. परंतु ती सामाजिक जागृती करणार आहे.सरकारने विजेची माहिती देण्या संदर्भात ‘दामिनी’ नावाचे मोबाइल ॲप आणले आहे. याचा जागर दामिनी या लघुपटातून आज पासून सुरू झाला आहे.
आषाढी एकादशी व मोहरम या सणाच्या पर्वावर वन्यजीव सोयरे बुलढाणा यांनी एक सामाजिक संदेश देणारा “दामिनी” लघुचित्रपट जनजागृतीसाठी प्रसारित केला आहे.या लघुचित्रपटाचे कलाकार राजिवकुमार तायडे, गजेंद्रसिंह राजपूत, अतुल करोड़पति, जगन्नाथ फकीरा इंगळे,दगड़ू माधवराव गाडेकर यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.संवाद शिवकुमार परदेसी येवला यांचा कैमरा आणि सहाय्यक दिग्दर्शक श्रीकांत पैठणे आहे. विशेष सहकार्य समस्त ग्रामस्थ बिरसिंगपुर, प्रा.डॉ.वंदना काकडे आणि अमित श्रीवास्तव यांचे तर कथा, पटकथा, संकल्पना, लेखन, दिग्दर्शन नितिन प्रतापसिंह श्रीवास्तव वन्यजीव सोयरे, बुलढाणा यांचे आहे.
प्रत्येक शहरी ग्रामीण भागातील नागरिकांनी You tube वर “दामिनी वन्यजीव सोयरे” लिहून शोधावे आणि हा लघुपट आवश्य पाहावे असे आवाहन वन्यजीव सोयरे, बुलढाणा कडून वन्यजीव सोयरे नितिन श्रीवास्तव यांनी केले आहे.