9.7 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

spot_img
spot_img

जल्लोष! देऊळगांव राजात ‘आर्टी’ निर्णयाचे स्वागत -फटाक्यांची आतिषबाजी ; पेढे वाटून महायुती सरकारचे मानले आभार

देऊळगांव राजा (हॅलो बुलढाणा)16 जूलै रोजी महाराष्ट्र शासनाने समस्त मातंग समाजाच्या शैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतिक व राजकीय उन्नतीसाठी साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) स्थापन करणेचा G.R.(शासन अध्यादेश) पारीत करून मंजूरी दिली.यामूळे मातंग समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मातंग समाजाचे युवा नेते सुनिल लोखंडे यांच्या मार्गदर्शनात आज दि. 17 जुलै रोजी स्थानिक बसस्टॅन्ड चौकात फटाक्यांची आतिषबाजी करून ढोल – ताश्यांच्या गजरात एकमेकांना पेढे भरवून जल्लोष साजरा केला.गेली अनेक वर्षापासून मातंग समाजातील विविध सामाजिक संघटना तसेच मिशन बार्टीच्या माध्यमातून मातंग तरूण यासाठीच संघर्ष करत होते या अथक संघर्षाला आज यश मिळाले आहे.यातून मातंग समाजाचे उज्वल भविष्य नक्कीच घडेल.

हा निर्णय मातंग समाजासाठी विकासाची सुवर्णसंधी आहे हा महाराष्ट्रातील तमाम मातंग बांधवांसाठी फार मोठा आनंदाचा सुवर्ण क्षण आहे. यावेळी मातंग समन्वय समिती प्रवक्ते ॲड.विलास साबळे,राजू गोफणे सर,पत्रकार संतोष जाधव, राज्य समन्वयक माधव गवळी यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!