बुलढाणा (हॅलो बुलडाणा) स्थानिक श्रीमती बसंतीबाई देवकीसनजी चांडक सहकार विद्या मंदिर डोंगर खंडाळा येथे दिनांक 16 जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त सांस्कृतिक सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते गावांमधून विठू माऊलींच्या गजरात पालखी मिरवण्यात आली. यावेळी स्थानिक संचालक अनंतराव सावळे ,बबनराव उजेड , बबनलाला गाडगे (सरपंच), व इतर संचालक मंडळ यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व पूजन करून सांस्कृतिक कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक सतीश रोढे , बु.अ. विभागीय व्यवस्थापक सुधीर भालेराव, गणेश बिबे, शा.व्यवस्थापक अनिल देशपांडे ,श्री देशमाने व श्री गाढवे, महाविद्यालयाचे प्रा विशाल सावळे, प्रा अभिजित वडाळकर, प्रा. सचिन खडके , प्रा. अक्षय नरवाडे , प्रा. वसंत , प्रा राजेंद्र घोराडे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात भक्ती गीतांनी व भजनांनी करण्यात आली यामध्ये विद्यार्थ्यांनी सुरेल भजने सादर केलीत व भक्ती गीतावर नृत्य करण्यात आले श्री थोरात, कुमारी जानवी पाटील व श्री कोल्हे तसेच अर्णव सपकाळ यांनी सामूहिक रित्या सुंदर हरिपाठ सादर केला. यानंतर विठुरायाची आरती व गायन नैना चव्हाण व सौ. देशमाने यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अमृता जेऊघाले व अनुष्का जेऊघाले यांनी केले व आभार प्रदर्शन श्री घुले यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी इत्यादींनी परिश्रम घेतले.