बुलढाणा (हॅलो बुलढाणा) भ्रष्टाचार कॅन्सर सारखा पसरत आहे. केवळ 2 हजार रुपये स्वीकारताना नांदुरा पंचायत समिती मधील कनिष्ठ सहाय्यक अभियंता खेमराज राठोडला अँटी करप्शन ब्युरो ने अटक केली आहे.
विशेष म्हणजे या फिर्यादी कडून या राठोड ने 1 ते 2 दिवसांपूर्वी दिवस अगोदर 13 हजार फोन पे ने घेतले होते. त्यानंतर अँटी करप्शन ब्युरो ने ट्रॅप लावून हा मासा जाळ्यात अडकविला.एक तक्रारदार यांचे व त्यांच्या आईचे घरकुलाचे प्रस्ताव पंचायत समीती नांदुरा येथे सादर केलेले होते. तक्रारदार हे त्यांच्या आईच्या घरकुलासाठी सादर केलेल्या
प्रस्तावाची चौकशी करण्याकरीता पंचायत समीती नांदुरा येथे गेले असता यातील लोकसेवक खेमराज
राठोड, पद-स्थापत्य अभियांत्रीकी सहायक, बांधकाम विभाग, पंचायत समीती नांदुरा हे तक्रारदार यांच्या
घरकुलाचा प्रस्ताव पाठविल्याचा मोबदला म्हणुन २००० रुपये लाचेची मागणी करीत होता अशी तक्रार अँटी करप्शन ब्युरो ला देण्यात आली. 15 जुलै रोजी लाचमागणीची पडताळणी कार्यवाही करण्यात आली. दरम्यान खेमराज राठोड तक्रारदाराकडे दोन हजार रुपयाची मागणी करताना आढळून आले. 16 जुलै रोजी त्यांनी तक्रारदार कडून दोन हजार रुपयाची रक्कम स्वीकारली. वेळीच अँटी करप्शन ब्युरो बुलढाणा ने राठोड यांच्यावर कारवाई केली आहे.