बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरातील हृदयस्थान असलेल्या जयस्तंभ चौकात हॉटेल पंजाब वाईन बार मध्ये चोरीची घटना घडली. विशेष म्हणजे चोरट्यांनी बियर आणि सिगारेट ओढून काही रोख रक्कम लंपास केली आहे. या घटनेमध्ये एकूण 6700 रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला आहे.
पोलीस सूत्रानुसार, 11 जुलै च्या रात्री साडेदहा वाजता च्या सुमारास हॉटेल मालक हॉटेल बंद करून घरी गेले. 12 जुलैला सकाळी साफसफाई करीत असताना त्यांना काउंटर उघडे दिसले. ड्राय ड्रावर मधील 2500 रुपये दिसून आले नाही. शिवाय फ्रीजमधील बटवायझर कंपनीच्या 10 बियर च्या बॉटल आढळून आल्या नाहीत. गोल्ड फ्लॅग लाईट कंपनीचे दहा सिगारेटचे पाकीट दिसून आले नाही. असे एकूण 67 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी वरील मजल्यावरील टिनाला छिद्र पाडून आत प्रवेश करून लंपास केला. अशा आशयाची तक्रार हॉटेल मालकांनी पोलिसांना दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.