spot_img
spot_img

सुसाट वाहने!वाहतुकीची कोंडी! – पार्किंगची व्यवस्था ही नाही! -‘हॅलो बुलढाणा’चा ऑन द स्पॉट रिपोर्ट..

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरातील प्रमुख चौकांसह कारंजा चौकात वाहतूक कोंडी होत आहे. येथे पार्किंगची व्यवस्थाच नाही. न.प प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत, असा उघड आरोप होत आहे.

केवळ मनमानी कारोभार नगरपालिकेचे सुरू आहे, असाही आरोप होत आहे. शहरातील
रस्ते रुंद झाले तरच गावाचा विकास होतो. मात्र, शहरात प्रत्येक रस्त्यांवर सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले जात आहे. अगोदरच अरुंद असलेले रस्ते आणखी अरुंद केले जातात. मात्र अतिक्रमण जैसे थे च राहते.शहरातील इतर चौकासह कारंजा चौक, संगम चौक, जस्तंभ चौक, त्रिशरण चौक येथे मोठ्या प्रमाणात मोठे वाहनासह छोटे वाहन भर रस्त्यात उभे करण्यात येत आहे त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना मोठा अडथळा निर्माण होत आहे.बुलढाणा शहरात सध्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली. शहरात सिग्नल नसल्याकारणामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी होत आहे अपघात होण्याचे प्रमाण सुद्धा यामध्ये वाढले आहे. नगरपालिकेने याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून उठत आहे.

▪️आज काय झाले ते पहा..

– बुलडाणा शहरातील तहसिल चौक ते ICICI बॅंकेपर्यंत तब्बल ४५ मिनिटे वाहतुक कोंडी झाली होती.
– अॅम्बुलन्स २० मिनिटे अडकुन पडली.
-शारदा ज्ञानपिठ व भारत विद्यालय यांची एकाच वेळेच शाळा सुटत असल्याने रविवार वगळता रोजच होते वाहतुक कोंडी

– विद्यार्थ्यांना घ्यायला आलेल्या ॲाटो, गाड्या रस्त्यावर उभ्या असतात, त्यामुळे वाहतुकीस अडचण निर्माण होते.
-१८ वर्षाखालील विद्यार्थी शाळेत आणतात २ व्हिलर बाईक्स.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!