बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अलीकडे ऑनलाइन फसवणुकीचे अनेक प्रकार घडत आहेत. एकाने 10 लाख 20 हजार लुबाडले आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
अभिजीत अनिल जाधव वय 39 वर्ष रा सुंदरखेड ता बुलढाणा यांची शेअर मार्केटच्या नावाखाली 10 लाख 20 हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली होती.बुलढाणा सायबर ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारावर वडनगर,जिल्हा म्हैसाना गुजरात येथील आरोपी अनिलजी अर्जुनजी ठाकूर याला वडनगर येथून अटक करत बुलडाण्यात आणले.आरोपीला बुलढाणा न्यायालय समोर हजर केले असता त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी 14 जुलैला सायंकाळी दिली आहे.