सिंदखेडराजा (हॅलो बुलडाणा / प्रतीक सोनपसरे) विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य महसूल कर्मचारी संघटनेने १० जुलैपासून आंदोलन छेडले आहे. बुधवारी काळ्या फिती लावून कामकाज केल्यानंतर ११ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली होती . राज्यातील सुमारे ३५ हजार कर्मचाऱ्यांनी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.बुलढाणा येथे राज्य सरचिटणीस किशोर हटकर यांच्या नेतृत्वात गुरुवारी आंदोलन करण्यात आले. आणि आज तहसील कार्यालय सिंदखेड राजा येथे लेखणीबंद आंदोलन करण्यात आले.
१३ व १४ तारखेची सुटी आल्याने विश्रांती
घेतल्यानंतर सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी आज १५ जुलै पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलेआहे. दांगट समितीच्या
अहवालातील शिफारशीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कपात महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध न करता लागू करावा, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार या पदावर पदोन्नती देण्यात यावी, महसूल विभाग तसेच अंतर्गत
संजय गांधी योजना, रोहयो, निर्वाचन व तत्सम विभागांचे वेतन देयके उणे प्राधिकारपत्रावर काढण्याचा शासन निर्णय जारी करावा, महसूल सहायकांचा ग्रेप पे २४०० रुपये करावा, महसूल विभागात एकच परीक्षा पद्धत लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी राज्यभरात आंदोलन छेडले आहे. यावेळी तहसील कार्यालय सिंदखेड राजा येथील सर्व विभागातील कर्मचारी उपस्थित होते