साखरखेर्डा (हॅलो बुलढाणा/दर्शन गवई)
चिखली येथील लग्न सोहळा आटोपून परत येणाऱ्या वाहनाचा रतीच्या गंजीमुळे अपघात झाल्याने दोघे जखमी झाले आहेत . चक्क रोडवर रेती टाकून टिप्पर चालक फरार झाले आहेत . उपरोक्त घटना ही चिखली ते लव्हाळा रोडवर माळखेड फाट्यावर १३ जुलै रोजी रात्री घडली .
याबाबत वृत्त असे की साखरखेर्डा येथील एक विवाह सोहळा चिखली येथील एका मंगल कार्यालयात आयोजित केला होता . साखरखेर्डा येथील बरीच वऱ्हाडी मंडळी या विवाह सोहळ्यात सहभागी झाली होती . विवाह सोहळा पार पाडल्यानंतर रात्री ११:३० वाजता काॅग्रेसचे नेते सुधीरअप्पा बेंदाडे , नितीन सावजी , व्यापारी मनोज सावजी आणि गिताराम तायडे साखरखेर्डा येथे परत निघाले . त्याच वेळी मेरा बु . , काटोडा , अंबाशी मार्गे चार रेतीचे टिप्पर खडकपुर्णा नदीपात्रातून अवैध रेती उपसा करून मेहकर ते चिखली रोडवर आले . त्याचवेळी त्या टिप्पर चालकांना पोलीस , आर टी ओं , आणि महसूल पथकातील कर्मचारी आपला पाठलाग करीत आहेत . अशी माहिती खबऱ्यांनी त्यांना दिली . आपण पकडल्या जाणार आहोत , या भितीने चारही टिप्पर चालकांनी रात्री ११ वाजताच्या सुमारास आमखेड फाट्याजवळ २०० मिटर अंतरावर रोडवर टिप्पर खाली करुन फरार झाले . हे सर्व टिप्पर मेहकर कडे गेले . रोडवर रेतीच्या गंजाचा अंदाज न आल्याने सुधीर अप्पा बेंदाडे याची कार चक्क रेतीच्या गंजावर गेल्याने अपघात झाला . यात अपघात नितीन सावजी आणि गिताराम तायडे हे दोघे जखमी झाले आहेत .
अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे .