बुलढाणा (हॅलो बुलढाणा) खडकपूर्णातून अवैध वाळू तस्करी चा धडाका सुरू असल्याने देऊळगाव राजा येथे जिल्हाधिकारी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. ही बाब जिल्हाधिकाऱ्यांना रुतल्याने त्यांनी तात्काळ आंदोलकावर गुन्हे दाखल केले. विशेष म्हणजे सर्वप्रथम ‘हॅलो बुलढाणा’ ने ही बातमी प्रसारित केली होती. यासंदर्भात व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. जिल्ह्यातील ही पहिली घटना होती.आंदोलक भुतेकर यांनी जिल्हाधिकारी यांची तक्रार वरिष्ठ पातळीवर केल्याने त्यांना लोक आयुक्त यांचा समन्स जारी झाला होता. त्यामुळे त्यांच्या संपात झाला असे आंदोलकाचे म्हणणे आहे.
दे. राजा आणि चिखली महसूलच्या हप्ते खोरीमुळे खडकपूर्णा नदी पात्रातून मोठया प्रमाणावर अवैध रेतीची वाहतूक केली जात आहे. या सर्व प्रकाराला बुलडाणा जिल्हाधिकारीच जबाबदार असल्याचे इसरुळ येथील माजी सरपंच संतोष भुतेकर यांनी अवैध रेतीचे टिप्पर अडवून जिल्हाधिकारी यांच्या फोटोला जोड्याने मारहाण करून निषेध नोंदवून व्हिडिओ व्हायरल केला. हा प्रकार चांगलाच अंगलट आल्याने चिखली तहसिलदार संतोष काकडे यांनी माजी सरपंच संतोष भुतेकर यांच्यावर १४ जुलै रोजी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. अवैध रेती वाहतूक व उत्खनन थांबणार तरी कधी? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.