बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आत्ताच हाती एक ब्रेकिंग बातमी लागली आहे. गुन्हे दाखल होण्याची प्रक्रिया सुरू असली तरी, सेकंदावरील घडामोडी वाचकापर्यंत पोहोचविणार नाही ते ‘हॅलो बुलढाणा’ कसले? असो! बातमी अशी आहे की, एका महिलेने आरोग्य सेवक म्हणून नोकरीचे आमिष दाखवून आधी 4 लाख आणि नंतर परीक्षा झाल्यावर 4 लाख रुपये असे 8 ते 10 जणांकडून लुबाडले. यासंदर्भात बुलढाणा शहर पोलीस गुन्हा दाखल करीत असल्याची पक्की खबर आहे.
रोजगारासाठी धडपडणाऱ्या तरुणांची अनेकदा मोठी फसवणूक होत असते. आरोग्य विभागात एम ओ असलेल्या एका महिलेचा फसवणुकीचा असाच प्रकार समोर आला आहे. सध्या ही महिला हिंगणघाट येथे कार्यरत आहे. आधी ती बुलढाणा मध्ये राहत होती. दरम्यान तिने बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फसवणूक केली आहे. आरोग्य सेवक म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून 8 ते 10 जणांना प्रत्येकी 8 लाख रुपयांना गंडा घालण्यात आला. या प्रकरणी पीडितांनी या महिलेविरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणे गाठले असून,शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.आरोपी महिलेचे नाव माहित पडली असून रीतसर गुन्हा दाखल झाल्यावर सविस्तर बातमी प्रसारित करण्यात येईल. विशेष म्हणजे नोकरी व धंदा नसणाऱ्या तरुणांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे लुटण्याचा गोरखधंदा अशा महिला करीत असतात.अशा आमिषाला बळी पडणाऱ्या तरुणांचीही संख्या वरचेवर वाढत असून, सुशिक्षितांनी ‘वो बुलाती है, मगर जाने का नही!’ एवढे ध्यानात ठेवणे गरजेचे आहे.