spot_img
spot_img

रस्ता वाहून गेला अन् संसाराची झाली वाताहात!

खामगाव (हॅलो बुलढाणा) घरासमोरील मुख्य रस्ता पावसाने वाहून गेलाय.. घरातील म्हातारे आईवडील, लहान पोरं-बाळं यांनी घरात ये-जा कशी करणार असा प्रश्न उपस्थित करत खामगाव तालुक्यातील आवार गावच्या विनोद घनमोडे’ने हॅलो बुलढाणा कडे तक्रारीचा टाहो फोडला आहे.

खामगाव तालुक्यातील विनोद घनमोडे (३६) रा.आवार यांचे घर गावातील एका कोपऱ्यात आहे. मागील दोन दिवसांआधी खामगाव तालुक्यातील आवार, नागापूर, पिंप्रीगवळी या गावात मागील काही वर्षात झाला नसेल एवढा पाऊस झाला होता. या पावसाने अनेकांची शेती पावसाने वाहून गेली होती. आमदार आकाश फुंडकर यांनी स्वतः नुकसान झालेल्या भागांची पाहणी करून पंचनामा करण्याचे आदेश दिले त्यानुसार पंचनामे चालू आहेत. मात्र विनोद घनमोडे यांच्या घरासह त्यांच्या घरात जाणारा कच्चा मुख्य रस्ता पावसाच्या पाण्याने वाहून गेला त्या रस्त्याला दोन – दोन, तीन – तीन फुटांचे गड्डे पडले आहेत. एखाद्या तरुण व्यक्तीलाही भर दिवसा त्या रस्त्याने घरात जायचे म्हटलं तर कठीण आहे. मग घनमोडे यांच्या घरात असलेले म्हातारे आईवडील, लहान पोरं-बाळं कसे जाणार? असा प्रश्न घनमोडे यांना पडला आहे. रात्रीच्या वेळी घराच्या बाजूला असलेल्या विजेच्या पोलवर मागील सहा महिण्यापासून साधा लाईट’ही नाही वारंवार ग्रामपंचायत ला सांगून लावू – लावू असे उत्तरे मिळत असल्याने शेवटी आपला टाहो घनमोडे यांनी आज हॅलो बुलढाणा कडे फोडला आहे. आतातरी संबंधित प्रशासनाला जाग येईल का? की फक्त गरीब आहे, म्हणून संबंधित प्रशासन घनमोडे यांच्या समस्येकडे दुर्लक्ष करेल..असा प्रश्न उपस्थित होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!