बुलढाणा (हॅलो बुलढाणा) वाळू तस्कर पुष्पा काही झुकत नाहीत! महसूल अधिकारी असो की पोलीस, त्यांची डायलॉग एकच ‘ हर्गिज झूकेंगा नही साला!’… त्यामुळे ग्रामस्थ पुरते हैराण झाले आहेत. दरम्यान युवा सेना चे जिल्हा उपप्रमुख संतोष भूतेकर यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेत थेट जिल्हाधिकारी यांच्या फोटोला जोडे मारले!
जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पातून राजेरोजपणे होणारी अवैध रेती वाहतूक जिल्ह्यातील महसूल प्रशासन थांबवू शकत नाही.. त्यामुळे युवा सेना चे जिल्हा उपप्रमुख संतोष भूतेकर इसरुळ येथील ग्रामस्थांनी अनोखे आंदोलन केलेय .. रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या गाड्या थांबवून गड्यांसमोर त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या प्रतीकात्मक फोटोला जोडे मारों आंदोलन करत निषेध व्यक्त केलाय .. तर जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या विरोधात घोषणां सुद्धा देण्यात आल्या .. यापूर्वी आंदोलकांनी अनेक वेळा तक्रार, निवेदन, आंदोलन केलीय, मात्र महसूल प्रशासना वर जिल्हाधिकारी यांचा वचक राहिलेला नाही .. आजही खडकपुर्णा प्रकल्पातून बोटी द्वारे रेतीचा उपसा केला जात आहे .. आणि याकडे महसूल प्रशासना दुर्लक्ष करत आहे. दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या फोटोला जोडे मारण्याची घटना जिल्ह्यातील पहिली आहे ही विशेष.