6 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

spot_img
spot_img

तो टीनात अडकला.. मग सुस्कारे टाकू लागला!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पहाटेच पानदिवड टिनपत्र्यात अडकला आणि फुस्स फुस्स करू लागला.. मग काय ? घरातल्यांची त्रेधातिरपीट उडाली. परंतु वेळेवर येणार नाहीत ते सर्पमित्र कसले? सर्पमित्र आले आणि या सापाला पकडल्याने उपस्थितांचा जीव भांड्यात पडला.

12 जुलै रोजी सकाळी 5 वाजता डाॅ.लोखंडे यांच्या हाॅस्पिटलच्या परिसरात पानदिवड बिन विषारी साप पकडण्यात आला. चिखली रोड वरील वऱ्हाडी कट्टाचे मालक एकनाथ परिहार यांचा फोन सर्पमित्र एसबी रसाळ यांना आला. घरी सकाळी 5 वाजेपासून एक साप घरात येत असतांना टिनामध्ये अडकला व फुस्स फुस्स करत आहे,असे सांगण्यात आले. दरम्यान सर्पमित्र रसाळ यांनी त्या सापाला पकडून वन विभागाच्या स्वाधीन केले आहे. दरम्यान साप दिसल्यास घाबरून न जाता तुमच्या जवळच्या सर्पमित्र यांना बोलवावे असे आवाहन एस.बि.रसाळ (सर्पमित्र )
अध्यक्ष वन्यजीव संरक्षण व निर्सग पर्यावरण संस्था बुलढाणा ( महाराष्ट्र) यांनी केले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!