spot_img
spot_img

कौतुकाची थाप! -उपक्रमशील शिक्षकांचा विनोबा ॲप मधील उत्कृष्ट कामगिरीचा सन्मान

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्हा परिषद बुलढाणा व ओपन लिंक फाउंडेशन यांच्यातील सामंजस्य करार अंतर्गत राबविण्यात येणारा आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम अर्थात विनोबा (बा) ॲपच्या माध्यमातून जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांना प्रत्येक महिन्यात प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.एप्रिल ते जून जिल्हा स्तरावरील ‘पोस्ट ऑफ द मंथ’ विजेते शिक्षक सारंगधर बांगर आणि श्रीकृष्ण भटकर जि प कें म प्रा शाळा वडशिंगी पंचायत समिती जळगांव जामोद, राहुल वैराळकर जिप म प्रा. शाळा भोनगाव पंचायत समिती शेगाव, निलेश गव्हांदे जिपमउ प्रा.शाळा निरोड पंचायत समिती संग्रामपूर,प्रमोद खरडे जिपमउ प्रा.शाळा चिंचोली पंचायत समिती शेगांव, सदाशिव नवले जिपमउप्रा शाळा अंजनी बु.पंचायत समिती मेहकर, विद्या चवरे जिपमउ प्रा. शाळा देवपूर पंचायत समिती बुलडाणा, श्रीदेवी देवगुंड जि प म उ प्रा शाळा सुटाळा बु. पंचायत समिती खामगांव या सर्व शिक्षकांना मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलडाणा कुलदीप जंगम l यांचे हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यांच्या उपस्थित पुरस्काराचे वितरण..

सदरील पुरस्कार वितरणा वेळी श्री खरात शिक्षण अधिकारी प्राथमिक, शिक्षक अधिकारी योजना सौ.ठग मॅडम,डायटचे प्राचार्य भटकर, उपशिक्षण अधिकारी उमेश जैन,देवकर यांच्यासह अनेक अधिकारी गण उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!