बुलढाणा (हॅलो बुलढाणा) विधानसभा जिल्हा परिषद आणि नगरपालिकेत पक्षात सक्रिय काम करणाऱ्या महिलांना उमेदवारी द्यावी ही मागणी,प्रदेश सचिव नंदिनी टारपे यांनी केली.
जिल्हा महिला काँग्रेस कमिटीची 9 जुलै रोजी महिला प्रदेश अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांच्या आदेशानुसार आढावा बैठक व महिला न्याय दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष मंगलाताई पाटील होत्या व प्रमुख पाहुण्या डॉ. संजीवनीताई बिहाडे होत्या.यावेळी
काँग्रेस मध्ये सक्रिय काम करणाऱ्या महिलांना
तालुका अध्यक्ष व शहर अध्यक्ष यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. दरम्यान महिला न्याय दरबाराचे उद्घाटन करण्यात आले. या विधानसभा निवडणुकीबाबतीत उमेदवारासंदर्भांत चर्चा केली.विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या महिलांची यादी करून महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसला पाठविन्याचे ठरले.वेळेवर विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच यावेळी महिला काँग्रेस च्या प्रदेश सचिव नंदिनी टारपे यांनी आपल्या भाषानातून नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीत काँग्रेस पक्षाला यश मिळाले असून येणाऱ्या काळात विधानसभा, जिल्हा परिषद व नगर पालिका पालिका निवडणूक येत आहेत.त्यासाठी महिला कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे तसेच ज्या महिला काँग्रेस पक्षात सक्रिय काम करून समाजाला न्याय देत आहेत अशा महिलाना प्रधान्याने उमेदवारी देऊ महिलांना निवडून आणण्याचे काम महिला पदाधिकाऱ्यांनी करावे असे मत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सौ.मंगलाताई पाटील व डॉ. संजीवणी बिहाडे तसेच मिनलताई आंबेकर यांनी त्याचे मत व्यक्त केले. बैठकीला प्रमिलाताई गवळी रजिया पटेल,मीराताई माळी, शालिनीताई वानखेडे, अलका लंबे,सुनंदा पवार पंचफुला पाटील, संगीता गाडेकर,विद्यादेश माने, कविता राजवैद्य,विमल माने, मनीषा अवचार, कल्पना पाटील, पुष्पा मापारी,संध्या मापारी, सीमा मेंहगे,संजना चव्हाण,लता चव्हाण सुनीता शेळके, रेणुका पाटील,आम्रपाली अवसरमोल, रंजना चव्हाण, पूजा मिरकुटे, रेखा भंडारे,मनीषा ठाकूर आदी उपस्थित होते.