बुलढाणा (हॅलो बुलढाणा) इयत्ता नववी मध्ये शिकणाऱ्या श्रवण दिलीप हिवाळे या 13 वर्षीय मुलाला शिक्षकासोबत मुख्याध्यापकाने चापटा मारून चोपल्याने मुख्याध्यापकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
श्रवणचा साडेतीन वाजता आज अकरा जुलैला गणिताचा पेपर होता. त्याने शेजारच्या विद्यार्थ्याकडे डोकावून पाहिले असता, पंकज चव्हाण यांनी डायरेक्ट मारायला सुरुवात केली. दरम्यान चंद्रकांत जोशी यांना फोन लावून वर्गात बोलाविले. त्यांनी देखील वर्गातून मारत मारत ऑफिसमध्ये घेऊन गेले व पेपर सोडायला लावला. असे विद्यार्थ्यांनी वडिलांना सांगितल्यावर दिलीप हिवाळे यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात माहिती विचारली असता, मुख्याध्यापक या विषयावर बोलण्यास टाळाटाळ करीत आहे.