spot_img
spot_img

लालुच! शासकीय भूखंडच घातला घशात! फसवणूक करणारा हा ‘डाबरमॅन’ कोण? चिखली रोडवरील प्लॉटची नियमबाह्य विक्री!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरातील चिखली रोडवर हजारो मीटर ओपन स्पेस च्या शासकीय जागेत प्लॉट टाकून शासनाची फसवणूक करत, प्लॉटची नियमबाह्य विक्री झाल्याची माहिती ‘हॅलो बुलढाणा’च्या हाती आली आहे. एका डाबरमॅनने (काल्पनिक नाव) लाखो रुपये खर्च करून भूखंडाचे श्रीखंड लाटल्याने, या डाबरमॅन वर फौजदारी गुन्हे दाखल होईल का? असा सवाल फसवणूक झालेले पीडित विचारत आहेत.

*चिखली रोड वरील गट क्रमांक 58 मधील परिसरात भूखंड व्यवसायातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या भूखंड व्यावसायिकाची लालसा पुढे गेल्याने नियमात ठरलेली शासकीय जमीन विक्री करुन त्याची विल्हेवाट लावली जात आहे भूखंडावर असलेले ओपन स्पेस विक्री करुन डाबरमॅनने शासनाच्या नजरेत धूळ टाकली आहे.* बुलढाणा शहर मुख्यालय आहे. त्यामुळे येथे बाहेरगावावरील नोकरी करणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. स्थानिकांसह विविध स्थलांतरित लोकांच्या राहणीमानाचा कल या परिसराकडे आहे. मुबलक दरात नागरिकांना भूखंड उपलब्ध व्हावे, यासाठी व्यावसायिकांचे प्रयत्न असतात. परंतु चिखली रोडवरील नव्याने निर्माणाधिन लोकवस्तीतील नागरिक आजही मुलभूत सुविधांपासून वंचित असून अशा डाबरमॅननी अनेक भागात भूखंड विक्रीकरिता मालकी तयार केली असल्याचे चित्र आहे. या गोरख धंदा करणाऱ्यांने भूखंड विक्री व्हावे यासाठी जमिनीच्या आराखड्यास शासनाच्या विविध विभागाकडून मंजूर करून घेतले.ओपन स्पेस विक्री केले.यावेळी भूमापन विभाग, महसूल विभाग व मुद्रांक नोंदणी विभाग यांनी या अनधिकृत जागेची विक्री व फेरफार नोंदणी केली कशी? असा प्रश्न पडला आहे. या ओपन स्पेस भूखंडाची विक्री करणाऱ्या व्यक्तीचे घबाड बाहेर पडणार काय? याची उत्सुकता लोकांना आहे. या गोरखधंद्यात राजकीय पुढाऱ्याचा वरदहस्त असल्याचेही प्रकार त्यांनी जाणवत असल्याचे नागरिक सांगत आहेत.

असे ऐकण्यात आले की मूठ्ठे ले आउट मधील या “डाबर मॅनने” भूखंड गिळण्याचा प्रयत्न केला असता त्याला काही समाज सेवकांनी चांगलेच बदडले!

क्रमश:

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!