spot_img
spot_img

अघोरी! पैशांच्या पावसात रक्त वाहले! -नेमके काय प्रकरण आहे ते.. -‘हॅलो बुलढाणा’च्या बातमीत वाचा..

बुलढाणा (हॅलो बुलढाणा)अघोरी विद्या, जादूटोणा, आणि नरबळी व इतर अमानुष अनिष्ट प्रथांना कायद्याद्वारे प्रतिबंध असतानाही, ‘पैशांचा पाऊस पडण्याचा’ प्रकार थांबत नसल्याचे एक उदाहरण समोर आले आहे.पैशाचा पाऊस पाडणाऱ्या टोळीतील अपहरण करण्यात आलेल्या युवकाचा तब्बल १८ दिवसानंतर कुजलेल्या अवस्थेत नगर जिल्ह्यात कर्जत नजीक मृतदेह ७ जुलै राेजी आढळला आहे़. दिलीप भिकाजी इंगळे असे मृतक युवकाचे नाव आहे़.

याप्रकरणी जानेफळ पोलिसांनी जानेफळ येथील २ तर सातारा व पुणे जिल्ह्यातील ३ अशा एकूण पाच आरोपींना अटक केली आहे़.यापैकी दाेघांना न्यायालयात हजर केले असताना त्यांना न्यायालयाने एक दिवसाची पाेलीस काेठडी सुनावली.
जानेफळ येथील ज्योती दिलीप इंगळे यांनी जानेफळ पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत अमाेल जयसिंग राजपूत व इतरांनी माझे पती दिलीप भिकाजी इंगळे याला पैशाचा पाऊस पाडण्याच्या कामासाठी दि.२२ जून रोजी घरून नेले हाेते़ तसेच रात्री कोकमठाण तालुका कोपरगाव जिल्हा नगर येथून त्यांचे अपहरण करण्यात आल्याचे म्हटले हाेते. या तक्रारीवरून जानेफळ पोलिसांनी दि.९ जुलै रोजी गुन्हे दाखल केले हाेते.दरम्यान, कर्जत तालुक्यातील राशीन जवळील वायसे वाडी परिसरात रस्त्याच्या कडेला एका युवकाचा मृतदेह ७ जुलै राेजी आढळला हाेता़ पाेलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून ओळख पटविली असता ताे मृतदेह दिलीप इंगळे यांचा असल्याचे १० जुलै राेजी समाेर आले आहे़ या प्रकरणी पाेलिसांनी ११ जुलै राेजी आरोपी संदीप उर्फ बाबुराव सुभाष शेवाळे वय २४ वर्ष रा. जानेफळ तालुका मेहकर, योगेश रमेश तोंडे अटक करण्यात आलेल्या पैकी संदीप सुभाष शेवाळे व योगेश रमेश तोंडे यांना आज दि.११ जुलै रोजी मेहकर न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना न्यायालयाने एक दिवसाची पाेलीस काेठडी सुनावली़ तपासा दरम्यान अपहरण करण्यात आलेल्या पैशाचा पाऊस पाडणाऱ्या टोळीतील दिलीप भिकाजी इंगळे यांची हत्या करण्यात आल्याचे समाेर आले आहे.
…….
अटकेतील आराेपींची कसून चाैकशी होणार..

अटकेत असलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू आहे़ काेणत्या कारणावरून दिलीप भिकाजी इंगळे याचा खून करण्यात आला? आणि तो खून कोणी केला? हे चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे. याप्रकरणी पुढील अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अजिनाथ मोरे व त्यांचे सहकारी करीत आहेत. वय २८ रा.जानेफळ तालुका मेहकर व बाहेर जिल्ह्यातील ३ जण असे एकूण ५ जणांना अटक केली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!