धामणगाव बढे (हॅलो बुलढाणा) अलीकडे आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे.किन्होळा येथे एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
कैलास कडुबा अहीरे 34 वर्ष रा. किन्होळा ता. मोताळा या इसमाने राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. मात्र आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
फिर्यादी पदमाकर आत्माराम गवई हे कामावरून घरी आले असता त्यांना माहीती पडले की, कैलास कडुबा अहीरे याने त्याचे राहते घरातच गळफास घेवुन आत्महत्त्या केली आहे. दरम्यान त्यांनी धामणगाव बढे पोलिसांना कळविले. या प्रकरणी मर्ग दाखल केला आहे.