नांदुरा (हॅलो बुलढाणा) रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदानाचे कार्य करणाऱ्या अमर पाटील यांना रक्तदाता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
गेल्या ६ वर्षांपासून संभाजी ब्रिगेड नांदुराच्या माध्यमातून अमर पाटील हे रक्तदान शिबिरांचे आयोजन करत आहेत. तसेच बाराही महिने ओळखीचे असो वा अनोळखी कोणीही फोन केला तरी रक्त उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न अमर रमेश पाटील हे करत असतात.या कार्याची दखल घेत अकोला येथील जिल्हा स्त्री रुग्णालय येथे ११ जुलै रोजी रक्तदाता म्हणून अमर पाटील यांना शासकीय रक्तपेढी अकोला कडून मुख्य रक्त संक्रमण अधिकारी डॉ.शीतल पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व गौरवपत्र देऊन गौरविण्यात आले.
सोबतच त्यांचे सहकारी कुलदीप डंबेलकर यांचा सुद्धा सन्मान चिन्ह व गौरवपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी जिल्हा स्त्री रुग्णालय अकोलाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.जयंत पाटील साहेब,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.तरंगतुषार वारे साहेब,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वंदना पटोकार,मुख्य रक्त संक्रमण अधिकारी डॉ.शीतल पवार,रक्त संक्रमण अधिकारी डॉ.कुंदन चव्हाण,रक्त संक्रमण अधिकारी डॉ.जोशी,रक्तपेढीचे कुशल तंत्रज्ञ मुशिर ,डॉ.भारती पानझाडे उपस्थित होते.