बुलढाणा (हॅलो बुलढाणा) एसटी प्रशासनाने देय तारखेस वेतन अदा करण्याचे मा. न्यायालयात मान्य केले आहे. मात्र ‘जून पेड इन जुलै 2024’ चे वेतन 10 तारीख उलटूनही झाले नाही. त्यामुळे महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीच्या वतीने बुलढाणा विभागीय कार्यशाळेच्या प्रवेशद्वारासमोर आज वेतन वेळेवर होण्यासाठी आक्रोश करण्यात आला.
एसटी प्रशासनाने देय तारखेस वेतन अदा करण्याचे न्यायालयात मान्य करूनही ‘जून पेड इन जुलैचे’ वेतन 10 तारीख उलटूनही झाले नाही. प्रशासनाकडून जी फाईल मंत्रालयात विभागाकडे पाठविण्यात आली होती ती बजेट प्रोव्हीजन नसल्याने नाकारण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आता फाईल नव्याने प्रोव्हीजन झाली असली तरी, सर्व सोपस्कार पूर्ण करून मुख्यमंत्र्यांची मंजुरी घेऊन वेतन देण्यास विलंब लागणार आहे. दरम्यान महिनाभर कष्ट करणाऱ्या एसटी कामगारांना हक्काचे वेतन त्वरित मिळावे यासाठी त्यांनी आंदोलन पुकारले. टी टाईम मध्ये कृती समितीच्या संघटनेतील विभागीय पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी वेतन वेळेवर होण्यासाठी आज 11 जुलै रोजी आक्रोश केला.
यामध्ये प्रामुख्याने कामगार नेते अशोकराव दाभाडे, सुभाषराव गाडे, विशाल बंगाले, प्रकाश इंगळे, राजाराम गवई, त्यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते.