बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शासनाने दिव्यांगांच्या बोगस प्रमाणपत्रास आळा बसावा म्हणून यू.डी.आय.डी. अपंग ‘ऑनलाईन’ प्रमाणपत्र सुरू केले आहे. मात्र, तरीही बनावट कागपत्रांद्वारे नोकऱ्या बळकावल्याचे गंभीर प्रकार समोर येत आहेत. बुलढाणा जिल्ह्यात तपास चक्र फिरविले तर असे उदाहरण आढळून येतील.’हॅलो बुलढाणा’ याचा पाठपुरावा करीत आहे.
जिल्हा परिषद शिक्षक असो की नगरपालिका किंवा जिल्हा सामान्य रुग्णालय आणि इतरही शासकीय कार्यालयात हा प्रकार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परंतु ज्यांना खरंच नोकरीची गरज आहे त्यांना दिव्यांगांचा दाखला मिळत नाही. संबंधित वैद्यकीय अधिकारी ही बोगसगिरी करीत असल्याचे उघडपणे बोलल्या जात आहे. ज्यांनी ज्यांनी बोगस प्रमाणपत्रावर नोकरी मिळविली त्यांना व प्रमाणपत्र देण्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल का होत नाहीत? हा मोठा प्रश्न आहे. शासनाने दिव्यांगांच्या बोगस प्रमाणपत्रास आळा बसावा म्हणून यू.डी.आय.डी. अपंग ‘ऑनलाईन’ प्रमाणपत्र सुरू केले आहे. मात्र, तरीही बनावट प्रमाणपत्र बनतात कसे? हा बोगस पणा करतो कोण? यासंदर्भात काहीशी माहिती हाती आली आहे. न्यायाचा कर्णधार म्हणून ‘हॅलो बुलढाणा’ची ओळख झाली आहे. अधिकाऱ्यांनी झोपेचे सोंग घेतले असले तरी, हॅलो बुलढाणा सजग आहे.