बुलढाणा (हॅलो बुलढाणा) भारतात इतर भाषांइतके उर्दू भाषेतील साहित्यालाही सन्मान जनक स्थान आहे. उर्दू गझल मध्ये दाग़ देहलवी, मिर्जा गालिब,मीर तकी मीर, मोमीन खां मोमिन यासारख्या दिग्गज शायरानी ज्याप्रमाणे उर्दू शायरी केले आहे त्याचप्रमाणे हिंदू शायर बांधवांनी देखील उर्दूमध्ये शायरी करण्याचे खूप मोठे काम केले आहे. ज्यात पंडित बीरज नारायण चकबस्त, दया शंकर नसीम, फ़िराक़ गोरखपुरी, जगन्नाथ आज़ाद, सागर त्रिपाठी, अशोक साहील या सर्वांच्या नावाबरोबरच एक नाव जोडल्या जाते ते बुलढाण्यातील शायर डॉ. गणेश गायकवाड यांचे डॉ. गायकवाड निष्णात शल्यचिकित्सक आहेत. त्याचबरोबर त्यांची शायरी सृजनशिल व सर्जनशील अशी आहे .त्यांच्या या उर्दू शायरी बद्दल पुसद येथे झालेल्या एका कार्यक्रमात डॉ. गणेश गायकवाड यांना अदाब इस्लामी हिंद अकादमी पुसद यांच्यावतीने मुसववीर कारंजवी अवॉर्डने सन्मानित करण्यात आले याप्रसंगी वजाहत मिर्झामाजी चेअरमन महाराष्ट्र वप्फ बोर्ड ,डॉ.नदिम जावेद, डॉ अकील मोमिन, डॉ.हस्नेम आकीब यांची उपस्थिती होती.
- Hellobuldana