बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आरोग्याला हानिकारक असलेला गुटखा जिल्ह्यात सहज दाखल होतो. मात्र कधीकधी या तस्करांवर कारवाई देखील केली जाते. दरम्यान ग्राम हातनी- सैलानी रोडवरील टोल नाक्याजवळ चिखली पोलिसांनी 9 जुलै रोजी 2 आरोपींसह 4,90,040 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
तंबाखूजन्य गुटखा वाहतूक करणाऱ्या या 2 आरोपीविरुद्ध
कलम123,223,274,275,bns,26(2),26(2)(iv ),26(2)(v),27(2)(e),30(2)(a),3,59 अन्नसुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 प्रमाणे गुन्ह्यांची नोंद झाली आहे. ताबिश उमेर अब्दुल हमीद कुरेशी वय 28 वर्ष रा.चांदुररेल्वे ह. मुक्काम पठाण चौक अमरावती, झनक नरेशजी बनबेरू वय 26 रा शिवाजीनगर जुनगाव बुलडाणा असे आरोपीचे नाव आहे. आरोपींकडून
मोठी विमल 16 कट्टे किंमत 1,55584, छोटी विमल 16 कट्टे किंमत 27,456,एक पांढऱ्या रंगाची जुनी स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एच २७ ए आर ८२५३ किंमत 3,00,000,
एम आय कंपनीचा जुना मोबाईल फोन किंमत 3000,ओपो कंपनीचा जुना मोबाईल किंमत 4000 असा एकूण 4,90,040 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैधपणे गुटखा वाहतूक व विक्री सुरू आहे. याकडे देखील पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे.