बुलढाणा (हॅलो बुलढाणा) वृक्षांवर प्रेम करणारे वृक्षप्रेमी पाहिजे.. वृक्ष लागवडीचा छंद पाहिजे.. वृक्ष संवर्धनाचा संकल्प पाहिजे.. असा संकल्प येथील वन्यजीव सोयरे यांनी केला आहे. त्यांनी जागतिक मातृ सुरक्षा दिनी धरती मातेच्या संवर्धनाची संकल्पना राबवून ज्ञानगंगा अभयारण्यातील संत सेवालाल महाराज टेकडीवर १०० झाडे लावून १० जुलै रोजी जागतिक मातृ सुरक्षा दिन साजरा केला.
ज्ञानगंगा अभयारण्यातील वन्यजीवांसाठी कार्य करणारे बुलडाणा येथील वन्यजीव सोयरे यांनी वन्यजीवांच्या खाद्याचा विचार करून वन्यजीवांच्या खाद्यासाठी उपयुक्त असणारी चिंचेची १०० झाडे लावली आहे. मागील १० जुलै २०२२ जागतिक मातृ सुरक्षा दिना पासून ज्ञानगंगा अभयारण्यातील संत सेवालाल महाराज टेकडी हिरवी करण्याच्या दृष्टीने दत्तक घेतली असून टेकडी परिसरात वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धन करत आहे. मागील दोन वर्षा पासून सदर टेकडी संवर्धनासाठी वन्यजीव सोयरे झटत आहेत. लावलेल्या १०० झाड़ा पैकी ६० झाड़ वाचविण्यात वन्यजीव सोयरे यांना यश आले आहे. संत सेवालाल महाराज आणि वृक्ष पूजनाने प्रा. डॉ. वंदना काकडे यांच्या हस्ते कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी वन्यजीव सोयरेचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.