देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/ संतोष जाधव)अग्निशमन यंत्राची माहिती विद्यार्थ्यांना किंवा नागरिकांना असल्यास त्या यंत्राचा आग लागल्यानंतर ऐनवेळी वापर कसा करावा हे माहिती असल्यास बऱ्याच दुर्घटना टळू शकतात यासाठीच राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल मधील विद्यार्थ्यांना अग्निशमन यंत्राचे प्रशिक्षण देण्यात आले
शाळा,हॉस्पिटल, मॉल, सिनेमा, थिएटर, बसस्टँड, रेल्वेस्थानक अशा सर्वच ठिकाणी अग्निशमनचे साहित्य दिसते; परंतु त्याचा प्रत्यक्ष वापर कसा करावा याची फारशी माहिती कोणाला नसते. त्यामुळे देऊळगाव राजा येथील राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल मध्ये विद्यार्थ्यांना अग्निशमनचे प्रशिक्षण देण्यात आले
आगीचा प्रकार ओळखून जसे आग
पेट्रोल आणि डिझेल अशा ज्वलनशील पदार्थांना लागलेल्या आगीचे शमन करण्यासाठी कार्बन डायआॅक्साइड, फॉग वापरता येते. तर लाकूड आणि कपडे अशा पदार्थांना लागलेली आग विझविण्यासाठी वाळू आणि पाण्याचा उपयोग करावा. मात्र विद्युतमुळे लागलेली आग विझविण्यासाठी पाण्याचा बिलकूल वापर करता येत नाही. विशेष म्हणजे सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या अग्निशमन यंत्रावर ते कशासाठी वापरावे यासाठी सूचना असतात
अग्निशमन यंत्राची माहिती विद्यार्थ्यांना किंवा नागरिकांना असल्यास त्या यंत्राचा आग लागल्यानंतर ऐनवेळी वापर कसा करावा हे माहिती असल्यास बऱ्याच दुर्घटना टळू शकतात यासाठीच विद्यार्थ्यांना अग्निशमन यंत्राचे प्रशिक्षण देण्यात आले हा हेतू डोळ्यासमोर ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अग्निशमन यंत्राचे प्रशिक्षण फायर ट्रेनर सुरज जाधव यांनी दिले
यावेळी राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल च्या अध्यक्षा मीनलताई शेळके , सचिव डॉक्टर रामप्रसाद शेळके शाळेचे सीईओ सुजित गुप्ता , शैक्षणिक प्रमुख डॉ. प्रियांका देशमुख मॅडम, फैसल उस्मानी सर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांची उपस्थिती होती.