बुलढाणा (हॅलो बुलढाणा) भ्रष्टाचार उघडकीस आणण्याच्या प्रकरणामुळे आरटीआय कार्यकर्ते भारत चव्हाण यांच्यावर अज्ञात चार ते पाच हल्लेखोरांनी लोखंडी रॉडने प्राणघातक लागल्याची घटना आज समोर आली आहे.
शहरातील जिल्हा परिषदेत मागील बोळीत एका चहाच्या दुकानावर आरटीआय कार्यकर्ते भारत चव्हाण उभे होते. दरम्यान अचानक अज्ञात चार ते पाच हल्लेखोरांनी त्यांच्यावर लोखंडी रॉडने डोक्यावर पाठीवर हल्ला चढविला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहे. त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. हल्लेखोरांच्या तोंडावर रुमाल बांधलेला होता. दरम्यान काही वेळातच येथे पोलीस यंत्रणा पोहोचली. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे