बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मंडळ अधिकारी विजय टेकाळे भूखंड घोटाळ्यांसाठी कुप्रसिद्ध आहे. या भूखंड माफियाला राजकीय व अधिकाऱ्यांचा वरदस्त मिळू लागल्यामुळे, त्याचे चांगलेच फावत आहे. आयुष्याच्या पुंजीवर डल्ला मारू पाहणा-या या भू- माफियांविरोधात पाश कधी आवळल्या जाणार हा प्रश्न चर्चिल्या जात आहे.
कोण कोणाची जमीन बनावट कागदपत्राआधारे बळकावेल किंवा एखाद्या आपला मालकी हक्क प्रस्थापित करेल, हे सांगता येत नाही. एका रात्रीतून या घटना घडतात. सर्वसामान्य नागरिकाने हक्काच्या एका तुकड्यासाठी जीवनभराची कमाई खर्च करून भूखंड घेतलेला असतो. त्याला न्याय मागण्यांसाठी साहजिकच पोलिस ठाण्यात खेटे घालावे लागतात. या प्रकरणांच्या कोर्टातील सुनावणीसाठी २५-३० वर्षे खेटे घालणारी उदाहरणेही आपल्यासमोर आहेत. अशात विजय टेकाळे याने मंडळ अधिकारी ते भू-माफियाचा प्रवास सर केला आहे. पण दुर्दैव असे की,अधिकारी टेकाळेपुढे लोटांगण घेत असल्याचे लाजिरवाणे चित्र आहे. नागरिकांना प्रश्न पडला की, एक साधारण बुलडाण्यातील मंडळाधिकारी विजय टेकाळे याने आतापर्यंत 100 कोटींच्या अधिक संपत्ती कामवालेली आहे. एका सामान्य व्यक्तीकडे 100 कोटीं पेक्षा जास्त संपत्ती कसे काय राहू शकते ? आज बुलडाण्यातील राजकिय नेते असो किंवा उद्योजक त्यांच्या कडे एवढी संपती नाही. पण या टेकाळेवर कारवाई का होत नाही? सगळीकडे मॅनेज कार्यक्रम चालतो का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. टेकाळे सोबत पार्टनरशिपमध्ये बुलडाणा शहरातील स्वयंघोषित नामांकित तीन ते चार व्यक्ती पण आहेत. शेतकरी व लोकांची कमी पडलेल्या ज्ञानाअभावी ही काही न काही त्रुटी कडून कमी पैशात ती जमीन स्वतःच्या नावावर करून घेणे हा यांचा गोरखधंदा बनला आहे. परंतु ‘हॅलो बुलढाणा’ या भूमाफियांवर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे प्रशासनाला त्यांच्यावर कारवाई करणे भाग पडणार आहे.