spot_img
spot_img

डोणगावात चोरट्यांचा धुमाकूळ; डॉक्टरचे घर फोडून लाखोंचा माल गायब!

डोणगाव (हॅलो बुलडाणा/अनिल राठोड) पुन्हा एकदा चोरट्यांनी धुमाकूळ घालत नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. वार्ड क्रमांक २ मधील खंडोबा परिसरात अज्ञात चोरट्यांनी प्रसिद्ध डॉक्टर गजानन पातुरकर यांचे बंद घर फोडून लाखोंचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

९ एप्रिल ते १३ एप्रिलदरम्यान ही चोरी झाली. डॉ. पातुरकर कुटुंबासह बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाट फोडून सोन्याच्या अंगठ्या, झुमके, नथ, गंठण तसेच चांदीच्या वस्तूंवर हात साफ केला.

या प्रकरणात पोलिसांनी केवळ १ लाख ७३ हजार रुपयांचा गुन्हा दाखल केला असला, तरी प्रत्यक्षात साडे दहा तोळे सोने आणि अर्धा किलो चांदी चोरीला गेल्याचा दावा डॉ. पातुरकर यांनी केला आहे. जुन्या पावत्यांवर आधारित पंचनामा केल्याने वास्तविक नुकसान झाकले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, डोणगाव पोलिसांनी BNS कलमांनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मात्र वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी तात्काळ कठोर कारवाई करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!