spot_img
spot_img

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी बहिणी त्रस्त!

लोणार (हॅलो बुलडाणा/ यासीन शेख) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना घोषणा केली खरी, मात्र प्रत्यक्षात या योजनेचा लाभ घेताना बहिणी त्रस्त झाल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. सदर योजनेची सुविध वेबसाईटवर अद्याप उपलब्ध करण्यात आलेली नाही असा आरोप होत आहे. सेतू केंद्रांवर या योजनेचा अर्ज भरता येत नसल्यामुळे अनेक सेतू केंद्रांवर महिलावर्ग आणि सेतू केंद्र चालकांमध्ये वादाच्या घटना घडत आहेत.

शासनाच्या नारीशक्ती दूत अॅपवर ही सुविधा उपलब्ध करून दिल्याचे सेतू केंद्र चालक सांगत आहेत. मात्र, सर्व्हर डाऊन असल्याने अॅपवर लॉगइनच होत नाही. त्यामुळे महिला वर्गाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक परिसरात मोबाईल नेटवर्क मिळत नसल्यामुळे अॅप सुरू होत नसल्याचे दिसून येत आहे. अंगणवाडी सेविकांकडे ग्रामीण भागातील महिला एकच गर्दी करत असल्याने त्यांना सुध्दा नारीशक्ती अॅपमध्ये पात्र महिलांची नोंदणी करताना एकच अर्जा अनेक तपास खर्च घालावी लागत आहेत. तर अनेकवेळा अॅपमध्ये महत्त्वाची कागद पत्रे संगणकीयप्रणाली प्रमाणे कमी अधिक साईज मध्ये समाविष्ट करताना अडचणी येत आहेत. आपले सरकार केंद्राकडे यांची व्यवस्थित वेबसाईट लिंक नसल्याने आपले सरकार केंद्र चालक अर्ज भरू शकत नाही. ग्रामीण भागात नारी शक्ती अॅपचा शासनस्तरावर प्रचार प्रसार करून ग्रामीण भागातील अनेक नव युवकांना प्रशिक्षण देण्यात यावे, त्यामुळे लाडकी बहिण योजना प्रभावी पणे राबविण्यात मदत होईल. एकंदरीतच काय तर या योजनेची फक्त घोषणाच झाली असून खऱ्या अर्थाने त्याची अंमलबजावण कधी होणार ?

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!