spot_img
spot_img

BIG BREAKING अयोध्या यात्रेवरून परतणाऱ्या बुलढाण्याच्या भाविकांवर काळाचा घाला! लक्झरी बसचा भीषण अपघात – 3 ठार, 35 जखमी

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अयोध्या व इतर तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी निघालेल्या बुलढाणा जिल्ह्यातील भाविकांवर काळाने झडप घातली आहे. धामणगाव बढे येथून निघालेल्या ‘जय श्री राम टूर्स अँड ट्रॅव्हल्स’च्या लक्झरी बसचा उत्तरप्रदेशातील नौसारा रोडवर आज सकाळी सुमारे ११ वाजता भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तीन भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून सुमारे ३५ जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बस अयोध्या दर्शन आटोपून वाराणसीमार्गे नेपाळकडे जात होती. मात्र नंदगंज पोलीस स्टेशन हद्दीत बसचा वेग अनियंत्रित झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बसने डिव्हायडरला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बस अक्षरशः समोरूम चुर चुर झाली या अपघातानंतर परिसरात एकच हाहाकार माजला.

या दुर्घटनेत मृतांमध्ये अन्नपूर्णा (अकोला) व सरस्वतीबाई यांचा समावेश असून एक महिला रोहीणखेड येथील असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींमध्ये अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. काही जखमींना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे काही काळ परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

दरम्यान, केंद्रीय मंत्री खासदार प्रतापराव जाधव यांनी या घटनेची तात्काळ दखल घेत प्रशासनाला सतर्क केले आहे. त्यांनी गाझीपूर जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधत जखमींवर तत्काळ आणि सर्वोत्तम उपचार करण्याचे आदेश दिले. तसेच बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनीही संबंधित प्रशासनाशी संपर्क साधून मदतकार्य वेगाने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

विशेष म्हणजे, केंद्रीय मंत्री जाधव यांचे स्वीय सहाय्यक डॉ. गोपाल डिके हे स्वतः घटनास्थळी रवाना झाले असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

भाविकांच्या आनंदी यात्रेवर अशा प्रकारे काळाने घाला घातल्याने बुलढाणा जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. दरम्यान, प्रशासनाकडून मृत व जखमींची संपूर्ण यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नसून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!