spot_img
spot_img

वाळूमाफियांना पोलीस घालत आहे पाठीशी? वंचित बहुजन आघाडीचा आरोप!

सिंदखेडराजा (हॅलो बुलडाणा /शिलवंत इंगळे) सविस्तर वृत्त असे की सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी येथे दि.8/जुलै 2024 रोजी 11: 30 वाजता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अवैध वाळु माफीया विरोधात ठिया आंदोलन केले असता त्या ठिकानी तहसिल व महसुल विभागाने कुठलीच दखल न घेता उलट किनगावराजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार व पोलीस कर्मचारी यांनी दडपशाही करुन आंदोलन चिरडवले व एक प्रकारे वाळु माफियाला अवैध वाळु तस्करीचे परमिटच दिले आहे. असा आरोप वंचितचे तालुका अध्यक्ष मधुकर शिंदे व कार्यकर्ते यांनी केला आहे

सिंदखेडराजा येथे अवैध वाळु माफिया ने किनगावराजा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अक्षरशा दिवसा ढवळया हैदोस माजवला आहे परंतु याकडे ना तहसिल लक्ष देते ना पोलीस स्टेशन लक्ष देते संबंधीत विभाग फक्त बघ्याची भुमिका घेते असून तालुक्यात गोरगरीब जनतेच्या घरकुल बाधकामाला रेती आॅनलाइन पध्दतीने देणार असे शासन म्हणते परंतु स्थानीक तहसिलची नागरीकांसाठी वेबसाईटच बंद असते व गरीबाला ती रेतीच उपलब्ध नसते परंतु अव्वाच्या सव्वा भाव दिला कि पाहिजे तेवढी रेती भेंटते या वाळु माफियावर कोणीच अधीकारी बोलत नाही एका राॅयलटिवर 5/6/गाड्या रेती काढतात व अमाप रेतीसाठा जमा करुन ठेवतात व नंतर तोच साठा मनमानी भावाने जनतेला देतात चोरीची घेऊन जाणारे वाहन येवढे भरधाव असतातकी ते गांव, बसटॅड, काहिच बघत नाहित. व एकाही वाहणाला नंबर प्लेट नाहित जर कोणी अडवण्याचा प्रयत्न केला व समझ देण्याचा प्रयत्न केला तर मद्यदुंद अवसतेत असलेला गाड़ी चालक हां अंगावर गाडीघालण्याचा प्रयत्न करतो. व गाड़ी चालक मालक हे अर्वाच भाषेत शिवीगाळ करतात. जर नागरीकांनी फोन द्वारे तहसिल कर्मचारी किंवा पोलीस स्टेशन यांना अवैध रेतीचे लोकेशन देण्याचा प्रयत्न केला तर संबंधीत दोन्ही विभागाचे कर्मचारी उडवाउडवीचे उत्तरे देतात. परंतु कधीच घटनास्थळी येत नाहीत. उलट एका प्रकारे वाळु माफीयांना पाठिशीच घालण्याचा प्रयत्न करतात. वाळुमाफीयांना जनता त्रस्त झाली आहे. म्हणुन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ठिया आंदोलन करण्याचे तहसिलदार यांना निवेदन देउनही कुठलीच कारवाई केली नाही उलटपक्षी आंदोलकाचे आंदोलन पोलीस कर्मचारी अधीकारी यांनी मोडीत काढले व कार्यकर्त्ता वर कलम 168प्रमाणे नोटिस बजावल्या व काही तास पो स्टेशनला स्थानबद्ध केले .
यावेळी मधुकर शिंदे यांनी सांगितले की लवकरच या विरोधात महाराष्टाचे मुख्यमंत्री, महसुल मंत्री, गृहमंत्री, यांना पक्षाच्या वतीने निवेदन देणार आहोत. यावेळी महेंद्र सोनवणे रामप्रसाद जायभाये संदिप अखाड़े अमोल गवई नानाभाउ गव‌ई मधुकर काळे शेषराव पाटिल नितीन सोनकांबळे बबलु म्हस्के प्रविण साळवे शेख जमीरभाई सुभाष साळवे सिद्धार्थ पवार महेंद्र खरात नितीन खरात सदाभाऊ रंधवे मिलींद रंधवे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!