spot_img
spot_img

BREAKING भरधाव आयशरची धडक! पॅंथर सेनेचे अध्यक्ष दिपक केदार यांच्या गाडीचा भीषण अपघात; चालक फरार

सिंदखेडराजा (हॅलो बुलडाणा) रोडवरील नवा घाट येथे आज एक धक्कादायक अपघात घडला असून पॅंथर सेनेचे अध्यक्ष दिपक केदार यांच्या गाडीला समोरून येणाऱ्या भरधाव आयशरने जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत गाडीचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. गाडीत असलेले सर्वजण थोडक्यात बचावले असून मोठा अनर्थ टळला आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, आयशर वाहन अत्यंत वेगात येत होते आणि चालकाने नियंत्रण गमावल्याने हा अपघात घडला. धडक दिल्यानंतर आयशर चालक घटनास्थळावरून पसार झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या निष्काळजीपणामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले असून प्रशासनाच्या वाहतूक नियंत्रणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करत जखमींना सुरक्षित बाहेर काढले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून फरार चालकाचा शोध सुरू आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!