spot_img
spot_img

जळगाव जामोदमध्ये अवैध अग्निशस्त्रांसह तिघांना अटक; पोलीसांची धडक कारवाई!

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यात गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून जळगाव जामोद येथे अवैध शस्त्र बाळगणाऱ्या तिघांना रंगेहात पकडण्यात आले आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मा. पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड (बुलढाणा) व अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा (खामगाव), तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशाने पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 1 एप्रिल 2026 रोजी जळगाव जामोद शहरातील श्रीमंत धाब्यामागील परिसरात सापळा रचला.

या कारवाईत पवन इंदरसिंग डावर (वय 23), संजय भिलासिंग बोडल (वय 20) व रमेश दुर्गासिंग बारेला (वय 24) या तिघांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र, दोन जिवंत काडतुसे व एक होंडा शाईन मोटरसायकल असा एकूण 1 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये आर्म अॅक्ट कलम 3, 25 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 123, 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासासाठी त्यांना पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही धडक कारवाई PSI अविनाश जयभाये, HC दिपक लेकुरवाळे, HC चांद शेख, HC गणेश पाटील, LPC आशा मोरे, HC राजू आडवे यांच्या पथकाने पार पाडली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!