spot_img
spot_img

रामनवमीचा जल्लोष! संतनगरी शेगावात भक्तांची उसळली गर्दी; वारकऱ्यांच्या दिंड्यांनी नगरी दुमदुमली

शेगाव (हॅलो बुलढाणा/महेंद्र मिश्रा) विदर्भाची प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगावात आज रामनवमीचा उत्सव भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. सकाळी नित्यक्रमानुसार पहाटे सात वाजता झालेल्या श्रींच्या आरतीने उत्सवाला मंगल सुरुवात झाली.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक दर्शनासाठी शेगावात दाखल झाले असून संपूर्ण नगरीत “जय श्रीराम” चा गजर घुमत आहे. विशेष म्हणजे यंदा 700 पेक्षा अधिक वारकरी दिंड्या संतनगरीत दाखल झाल्याने भक्तीचा उत्साह अधिकच द्विगुणित झाला आहे.

दिवसभर विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी श्रींच्या रजत मुखवट्याची भव्य नगर परिक्रमा काढण्यात येणार असून, त्यात हजारो भाविक सहभागी होणार आहेत. संध्याकाळी वारकऱ्यांच्या पारंपरिक रिंगण सोहळ्याने उत्सवाची सांगता होणार आहे.

शेगाव नगरीत सध्या सर्वत्र भक्तिभाव, उत्साह आणि आध्यात्मिक उर्जा अनुभवायला मिळत असून, भाविकांच्या उपस्थितीने संतनगरी अक्षरशः फुलून गेली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!