बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पोलीस रात्री कितीही गस्त घालीत असले तरी, चोरटे आपली संधी साधतात.. शहरातील तार कॉलनी येथील उमेश नारायणराव जैन यांच्या घरात वरील मजल्यावर जगताप राहतात. त्यांच्या घरातील कपाटातून रात्री अज्ञात चोरट्यांनी जवळपास लाख रुपयांचा सोन्याच्या दागिन्यांचा ऐवज लंपास केला आहे. सुनील राजेंद्र जगताप यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. चिखली रोडवर त्यांची चंद्रकोर नावाची हॉटेल आहे. त्यांनी म्हटले की मी घर बंद करून, चाबी बुटात ठेवून हॉटेलवर कामासाठी जात असतो. ते हॉटेलवर गेले असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप उघडून कपाटातील 70 हजार रुपयांची 25 ग्रॅमची सोन्याची पोथ, व 15 ग्रॅम वजनाचे 25 हजार रुपयांचे सोन्याचे झुमके, दागिने चोरीला गेले आहेत. अशी जवळपास 95 हजार ते एक लाख रुपयांची चोरी झाली आहे.
- Hellobuldana