spot_img
spot_img

‘बंडू’ गेला… ट्रॅक्टरखाली दबून कष्टकरी तरुणाचा हृदयद्रावक अंत

संग्रामपूर (हॅलो बुलढाणा) तालुक्यातील काकोडा येथे मंगळवारी (ता. २४) दुपारी घडलेल्या भीषण अपघातात २४ वर्षीय युवकाचा ट्रॅक्टरखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश अर्जुन उर्फ बंडू पाटील मानखैर हा युवक कवठळ परिसरातील एका शेतकऱ्याच्या शेतात मजुरीने ट्रॅक्टरद्वारे नांगरटीचे काम करत होता. काम सुरू असताना ट्रॅक्टर वळविताना अचानक त्याचा तोल गेला आणि ट्रॅक्टर अवजारासह शेताजवळील जुन्या विहिरीत पलटी झाला. या अपघातात गणेश ट्रॅक्टरखाली दबला.

घटनेची माहिती मिळताच शेजारच्या शेतकऱ्यांनी धाव घेत त्याला बाहेर काढले व तातडीने शेगाव येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

गणेश हा अत्यल्प भूधारक कुटुंबातील मुलगा असून मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!