बुलढाणा (हॅलो बुलढाणा)महाराष्ट्र योगासन स्पोर्टस् असोसिएशन शाखा बुलढाणातर्फे २८ जुलै रोजी १० ते ५५ वर्षांपर्यंतच्या सर्व वयोगटांच्या जिल्हास्तरीय योगासन निवड चाचणीचे आयोजन बुलढाण्यात करण्यात आले आहे.
मयूर कुंज येथील संतुलन योग केंद्र येथे ही निवड चाचणी होणार आहे.यातून निवडलेला संघ १६ ते १८ ऑगस्ट रोजी संगमनेर येथे होणाऱ्या महाराष्ट्र योगासन स्पोर्टस् असोसिएशनच्या राज्य स्पर्धेसाठी पाठवला जाईल. योगासनांचा आशियाई स्पर्धांमध्ये प्रवेश निश्चित झाला असल्यामुळे जास्तीत जास्त स्पर्धकांनी
जिल्हा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा. या स्पर्धांचे वयोगट, अभ्यासक्रम तसेच प्रवेश अर्जाबाबत संघटनेचे अध्यक्ष डॉ पुरुषोत्तम उपरवट (९८५०२८११५०) किंवा
जिल्हा समन्वयक डॉ वैशाली गजेंद्र निकम (९४२३०५७५९९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन बुलढाणा जिल्हा योग संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.