spot_img
spot_img

सुलतानपुरात जपली सामाजिक सलोख्याची परंपरा; पायी दिंडी आणि ईदचा झाला अपूर्व संगम!

सुलतानपूर (हॅलो बुलडाणा/मोईन खान)
आज देशभरात रमजान ईदचा उत्साह असतानाच, सुलतानपूर येथे सामाजिक सलोख्याचे आणि बंधुभावाचे एक अतिशय सुंदर चित्र पाहायला मिळाले. एकीकडे मुस्लिम बांधव ईदची नमाज अदा करण्यासाठी ईदगाहकडे जात होते, तर दुसरीकडे त्याच मार्गावरून हिंदू बांधवांची पायी दिंडी मार्गस्थ होत होती. या दोन वेगवेगळ्या प्रवासांचा जेव्हा संगम झाला, तेव्हा धर्माच्या भिंती ओलांडून माणुसकीचे दर्शन घडले.
ईदगाहकडे जाणाऱ्या मुस्लिम तरुण बांधवांनी मोठ्या उत्साहात पायी दिंडीतील वारकरी आणि हिंदू बांधवांची भेट घेतली. यावेळी मुस्लिम बांधवांनी दिंडीतील बांधवांना मनापासून ‘रमजान ईद’च्या शुभेच्छा दिल्या. या हृदयस्पर्शी प्रसंगामुळे परिसरात आनंदाचे आणि सलोख्याचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रसंगी मोईन खान, शेख अहेमद शेख लाल, शेख वकार, अहमदनूर, तोसिफ हसन, वसीम खान, शेख इमरान, शेख शोएब या तरुण मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या. ‘सण कोणताही असो, तो आनंद आणि एकमेकांप्रती आदर घेऊन येतो’, हेच या प्रसंगातून सुलतानपूरकरांनी दाखवून दिले आहे. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!