बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली असून, पालकांच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.७० वर्षीय वृद्धाविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा शहर पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली.स्थानिक नागरिकांच्या मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ हालचाल करत प्रकरणाची दखल घेतली.त्यानंतर फिर्यादी यांनी अधिकृत तक्रार दाखल केली.
आरोपी शंकर मंगतानी (वय ७०), बुलढाण्यातील एक व्यापारी असून तो पीडित मुलीच्या व त्याच्या घरच्यांच्या ओळखीचाच आहे. आरोपी आणि पीडित कुटुंबामध्ये पूर्वीपासून येणं-जाणं असल्याने विश्वासाचे नाते होते.मात्र, याच विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपीने मुलगी एकटी असताना तिच्याशी अश्लील वर्तन करत विनयभंग केल्याचा आरोप आहे.
त्यानंतर पीडित मुलीनेही हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला आणि कुटुंबीयांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.
या गंभीर प्रकरणात पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम ६४(२)(i), ६६, ६५(१), ७५(१) तसेच पोक्सो कायद्यांतर्गत कलम ४ आणि ६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सुधा पाटील या करत आहेत.दरम्यान,पालकांच्या जागरूकतेमुळेच हा प्रकार उघडकीस आल्याची चर्चा असून,समाजात वावरणाऱ्या या अश्या नराधम आरोपीवर कठोरात कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.










