बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शिक्षणासोबत कला,क्रीडा,विज्ञान, राजकारण आणि समाजकारणाबरोबर मुलांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा या अनुषंगाने शालेय जीवनात त्यांना राजकारण आणि समाजकारणाचे धडे देखील दिले जातात. हाच उद्देश ठेवून येथील शिवसाई युनिव्हर्सल स्कूलमध्ये मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली. विद्यार्थी व शिक्षक वृंदांनी मतदानाचा अधिकार बजावून व विजयी झालेल्या उमेदवारांमधून मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली. मंत्रिमंडळाच्या शपथविधीला शिवसाई युनिव्हर्सल स्कुलचे संचालक डी एस लहाने व मुख्याध्यापक प्रमोद मोहरकर यांनी मंत्रिमंडळाला शपथ दिली. शिवसाई शाळेला नवीन मुख्यमंत्री म्हणून भुषण कानडजे यांनी शपथ घेतली. गौरव गोरे -शालेय शिक्षण मंत्री, शिवतेज उबरहंडे- शालेय शिस्त मंत्री, प्रणव सोळंकी- विज्ञान तंत्रज्ञान मंत्री, जय शेवाळे – पर्यटन क्षेत्रभेट, संस्कृती धंदर – क्रीडामंत्री, काव्या भारंबे – सांस्कृतिक मंत्री अशाप्रकारे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला.
- Hellobuldana