बुलढाणा (हॅलो बुलढाणा) वन विभागांतर्गत रखडलेला विकास आमदार संजय गायकवाड यांच्या पुढाकाराने मार्गी लागणार आहे.
आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील वनविभागाअंतर्गत येणाऱ्या जमिनीमुळे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी रखडलेले अनेक प्रकल्प मार्गी लावण्याकरिता बैठक घेतली. बैठकीत राजुर घाट दुतर्फा रस्ता निर्मिती करणे,बोरखेड वरवंड बंगला रस्ता तसेच खैरखेड तरोडा रस्ता, डोंगर खंडाळा गावदरीतील जुन्या पाझर तलावाच्या खालील वनविभागाच्या जमिनीवर नवीन मोठ्या क्षमतेचा साठवण तलाव निर्मिती करणे तसेच उबाळखेड येथे नवीन साठवण तलावाची निर्मिती करणे व जमीन लागत असल्याने बुलढाणा जिल्ह्याचे डेपो सीसीएफ व मुख्य प्रधान सचिव रेड्डी यांच्या समावेत त्यांच्या दालनामध्ये अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली आहे. बुलढाणा नगर परिषदेचे सिओ, मृद व जलसंधारण अधिकारी मुंडे तसेच पीडब्ल्यूडीचे अधिकारी राऊत यांच्या समवेत बैठक घेऊन सर्व गोष्टी या वन विभागामार्फत मार्गी लावून घेतल्या असल्याची सूत्रांनी माहिती दिली.