spot_img
spot_img

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय!’ -शहर पोलिसांची ‘खाकी’ चमकायला हवीच! -कारण ही तसे आहे..

बुलढाणा (हॅलो बुलढाणा/ अजय राजगुरे) प्रत्येक नागरिकांचं आयुष्य, स्वातंत्र्य आणि मूलभूत कायदेशीर अधिकार यांच्या संरक्षणासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्यासह शहर पोलिसांना प्रतिबद्ध राहावं लागणार आहे. शहरात भयमुक्त आणि निःपक्षपाती पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्था यांची अंमलबजावणी करण्याची ग्वाही पोलीस देत असले तरी, धडाकेबाज कारवाई अपेक्षित आहे.

कारण शहरात क्राईम वाढत आहे.असे नाही की पोलीस कर्तव्य निभावत नाही. त्यांचा जोरकसपणे प्रयत्न सुरू असतो.
बुलढाणा शहरात 1 जानेवारी ते 30 जून पर्यंत त्यांनी केलेल्या कारवाईची दखल घ्यावीच लागणार आहे.

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीदवाक्य! यानुसार समाजातील भल्यांचं संरक्षण करण्यासोबतच गुन्हेगारी तत्वांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न पोलिसांकडून करण्याची अपेक्षा व्यक्त होत असते.
शहरातील सर्व नागरिकांनीही प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे आणि कायद्यांचे काटेकोरणे पालन करावे, अशी विनंती पोलीस सर्वांना करत असते आणि सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून शहरात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली जाऊ शकते..
हे लिहिण्याची कारण की,बुलढाणा शहर पोलीस स्टेशन अंतर्गत चोरी,घरफोडी,दरोडा,जरी चोरी अशा या घटना घडल्यात.यामध्ये बुलढाणा शहर पोलीस स्टेशन येथे 91 घटना दाखल झाल्या तर यामध्ये 34 घटनांचा उलगडा झाला. यामध्ये 32 आरोपींचा समावेश आहे.
याप्रकरणी एकूण 3512970 रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला होता.
दरम्यान 1033800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.बुलढाणा शहर पोलीस स्टेशन अंतर्गत सहा महिन्यांमध्ये 1 खून झाला होता. हे प्रकरण उघड झाले असून यामध्ये 3 आरोपींना अटक करण्यात आली.
हाफ मर्डर 1 झाला होता यामध्ये 1 आरोपी अटक करण्यात आला. तसेच 7 बलात्काराच्या घटना घडल्या. या सातही प्रकरणाचा निपटारा झाला असून यामध्ये 11 आरोपींचा समावेश आहे.
विनयभंग झालेल्या घटनांमध्ये10 घटनांचा समावेश असून या घटनांमध्ये 10 घटना उघडकीस आल्या. यामध्ये सहा आरोपींचा समावेश आहे.बुलढाणा शहर पोलीस स्टेशनने अवघ्या 6 महिन्यात 53 आरोपींना खाकीचा हिसका दाखविला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!