spot_img
spot_img

क्षुल्लक कारणावरून भावाकडून भावाचा खून; सुटाळा बुद्रुकमध्ये खळबळ

खामगाव (हॅलो बुलडाणा) किरकोळ कारणावरून सख्ख्या भावानेच भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना खामगाव तालुक्यातील सुटाळा बुद्रुक येथे घडली असून संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देविदास महादेव गायकी (वय २८) असे मृत तरुणाचे नाव असून मंगेश महादेव गायकी (वय २५) हा त्याचा सख्खा भाऊ आणि आरोपी आहे. दोघेही सुटाळा बुद्रुक येथील नागोबा मंदिर परिसरात वास्तव्यास होते. दरवाजाच्या किरकोळ कारणावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की संतापाच्या भरात मंगेशने देविदासवर जीवघेणा हल्ला केला.

या हल्ल्यात देविदास गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान, शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी मंगेश गायकी याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!